आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:बोरखेडा शिवारातून 400 फूट लांब केबल चोरीला

यावल2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील बोरखेडा शिवारातून ३० हजार रुपये किमतीची ४०० फूट लांबीची तांब्याची तार असलेली केबल चोरट्याने लांबवली. हा प्रकार निदर्शनास येतात फैजपूर पोलिस ठाण्यात अज्ञात गुन्हा दाखल करण्यात आला.

बोरखेडा शेत शिवारात गट क्रमांक ६६७ मध्ये ४०० फूट लांबीची तीस हजार रुपये किमतीची तांब्याची केबल वायर टाकली होती. पाणीपुरवठ्यासाठी असलेली ही केबल अज्ञात भामट्याने चोरी करून नेली. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर मोहंमद नजीफ हमीदुद्दीन फारुकी यांच्या फिर्यादीवरून फैजपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

बातम्या आणखी आहेत...