आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:मराठी शुद्धलेखनाच्या‎ आदेशाला पाठ्यपुस्तक‎ मंडळाची केराची टोपली‎

भुसावळ‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शासनाच्या पाठ्यपुस्तक निर्मिती व‎ संशोधन मंडळ, पुणे यांनी पहिली ते‎ बारावीपर्यंतच्या सर्व पाठ्यपुस्तकात‎ सर्वत्र ‘ल’ व ‘श’ व तोडाक्षर‎ पद्धतीच कायम ठेवली आहे. द्वी‎ ऐवजी दुवि, उद्देश ऐवजी उद्देश्य‎ असे अनेक शब्द पाठ्यपुस्तकात‎ आढळतात. यामुळे शासनाच्या‎ आदेशाला एक प्रकारे केराची‎ टाेपली दाखवणे सुरू असल्याचा‎ आराेप शिक्षण तज्ञ प्र.ह.दलाल‎ यांनी केला आहे.‎

मराठीतील लेखनदोष दूर‎ करण्यासाठी नियुक्त समितीच्या‎ शिफारशी स्वीकारून राज्य‎ शासनाने ६ नोव्हेंबर २००९ रोजी‎ पारंपारिक जोडाक्षर पद्धती व ‘श’,‎ ‘ल’ ही पारंपारिक वळणे पुन्हा सुरु‎ करण्यासाठी आदेश काढला होता.‎ हा निर्णय सर्व शासकीय,‎ निमशासकीय कार्यालये, शैक्षणिक‎ संस्था, पाठ्यपुस्तक निर्मिती‎ मंडळांना बंधनकारक होता. पण,‎ तो पाळला जात नाही. याबाबत‎ दलाल यांनी दिलेल्या निवेदनात,‎ पाठ्यपुस्तक मंडळाला या‎ नियमांवर आक्षेप असला तरी‎ त्यावर शासन निर्णय देत नाही‎ तोपर्यंत विद्यमान आदेशच पाळावा‎ असे आवाहन केले आहे.‎

बातम्या आणखी आहेत...