आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

६ कोटींपर्यंत थकबाकी:वीज थकबाकीचे ओझे कमी करण्याची मोहीम

भुसावळ6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महावितरणची शहरात तब्बल ४ कोटी, तर भुसावळ विभागात ६ कोटींपर्यंत थकबाकी आहे. ही थकबाकी वसुलीसाठी महावितरणने धडक मोहीम हाती घेतली आहे. त्यात शासकीय कार्यालये, घरगुती, व्यावसायिक व औद्याेगिक वीज थकबाकीदार रडारवर आहेत. त्यात आठवडाभरातच थकीत बिल न भरणाऱ्या २४० ग्राहकांचे वीज कनेक्शन तात्पुरत्या स्वरुपात खंडित करण्यात आले.

भुसावळ शहरात महावितरणची थकबाकी ४ कोटी ३० लाखांवर पोहोचली आहे. यात १ ते ५ हजार रुपयांपर्यंतच्या थकबाकीदारांची संख्या जास्त आहे. यामुळे महावितरणने थकबाकी वसुलीसाठी धडक मोहीम हाती घेतली आहे. ग्राहकांच्या घरोघरी जावून थकबाकीची मागणी केली जाते. त्यास प्रतिसाद न देणाऱ्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केला जातो. गेल्या आठवडाभरात भुसावळ शहरातील २४५ ग्राहकांचा वीजपुरवठा या पद्धतीने तात्पुरत्या स्वरुपात खंडित केला. मात्र, वीज बिल भरताच त्याची पुन्हा जोडणी केली जाते. मात्र, तात्पुरत्या कारवाई नंतरही थकबाकी न भरणाऱ्या ग्राहकांचा वीजपुरवठा कायमस्वरुपी खंडित करण्यात येईल, असे महावितरणचे कार्यकारी अभियंता प्रदीप घोरुडे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...