आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऐवज लुटून दुचाकीवरून पोबारा:निवृत्त जवानास लुटणाऱ्या त्रिकुटाविरुद्ध गुन्हा दाखल

भुसावळ23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोटर सायकलवरून बहिणीकडे निघालेल्या येथील निवृत्त आर्मी जवानाला त्रिकुटाने अडवून लुटले. ही घटना शहरातील अष्टभूजा मंदिराजवळ ९ सप्टेंबर रोजी रात्री दीड वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसांत गुन्हा दाखल झाला. राजेश मारोती कोल्हे (वय ४७, रा. दुर्गा कॉलनी, जामनेर रोड, भुसावळ) हे शुक्रवारी रात्री भुसावळ येथून नशिराबादला बहिणीकडे दुचाकीने (एमएच.१९-एके.८७९०) निघाले होते.

जामनेर रोडवरील अष्टभुजा देवीच्या मंदिराजवळ दुचाकीवरून आलेल्या तिघांनी त्यांचा रस्ता अडवून थांबवले. यानंतर कोल्हे यांच्याकडील मोबाइल, पॉवर बँक,आर्मी कार्ड व पाचशे रुपयांची रोकड असा एकूण ७ हजार ७०० रुपयांचा ऐवज लुटून दुचाकीवरून पोबारा केला. घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, बाजारपेठ पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड आदींनी भेट देत प्रकार जाणून घेतला. कोल्हे यांच्या फिर्यादीवरून शनिवारी रात्री ८ वाजता अनोळखी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला.

बातम्या आणखी आहेत...