आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील टेक्निकल हायस्कूल समोर रविवारी (दि. ३१) रात्री ८ वाजता चाकू हल्ला झाला होता. या प्रकरणी भुसावळ शहर पोलिस ठाण्यात मंगळवारी रात्री माजी नगरसेवक संतोष बारसेसह चार जणांविरुद्ध कलम ३०७ नुसार खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला. शहरात टेक्निकल हायस्कूलजवळ अजयसिंग उर्फ पापाराव रायसिंग पंडित याच्यावर चाकू हल्ला केल्याची घटना रविवारी रात्री आठला घडली हाेती. अजयसिंगचा मित्र पासी याचे हर्षलकडे फर्निचरचे ३० हजार रूपये घेणे हाेते. अजयची हर्षलसोबत ओळख असल्याने पासीने त्यास हर्षलला पैसे देण्यास सांगावे अशी गळ घातली. त्यानुसार अजयसिंगने हर्षला सूचना केली. यातून वाद निर्माण झाले. त्यात हर्षलने त्याच्या हातातील चाकूने अजयसिंगवर वार केले. मुकेश भालेराव याने त्याच्या हातातील पिस्तूल उलट्या बाजूने डोक्यात मारले. भरतने दगड व लाथा बुक्क्यांनी मारहाण केली, तर संतोष बारसे यांनी अगोदरच जीवे मारण्याची धमकी दिली हाेती असे अजयसिंग पंडीत फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार खुनाचा प्रयत्न केल्याच्या कलमानुसार गुन्हा दाखल झाला. एपीआय संदीप दुणगहू हे तपास करत आहे
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.