आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील कोथळी येथील संत मुक्ताबाई मंदिराजवळच शनिवारी पहाटे पाच वर्ष वयाचे हरीण जुनी मुक्ताबाई ते मानेगाव रोड दरम्यान मृतावस्थेत आढळले. हरीण प्राणी भित्रा असल्याने व चपळ असल्याने त्याची भिंतीला किंवा एखाद्या वस्तूला धडक होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला असावा, असा अंदाज वर्तवण्यात आला.
मंदिराकडे जाणाऱ्या भाविकाने, मंदिराजवळच हरणाचा मृतदेह पडला असून कुत्रे त्याचे लचके तोडत असल्याचे आढळल्याने त्यांनी याबाबत पोलिस पाटील संजय चौधरी यांना माहिती कळवली. पोलिस पाटील यांनी त्वरित वन विभागाशी संपर्क साधून माहिती दिल्याने वनक्षेत्रपाल एस.आर. ठाकरे, दीपश्री जाधव, बी.एन. पाटील व पवार यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. वाहनाच्या अपघातात व प्राण्याच्या हल्ल्यात या हरणाचा मृत्यू झाला नसल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. हरिणाचा मृतदेह ताब्यात घेऊन निमखेडी रोपवाटिका येथे आणला. तेथे येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.अभय डूघ्रेकर, पशुधन विकास अधिकारी डॉ.अश्विनी दाभाडे तसेच पशुधन पर्यवेक्षक एन.जे. जवरे यांनी शवविच्छेदन केले. नंतर वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या आदेशाने हरिणीस अग्निडाग देण्यात आला. यावेळी दीपश्री जाधव, वनरक्षक बी.एम. पाटील, नवल जाधव, नितीन खंडारे, संचलाल पवार, दिगंबर पाटील आदी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.