आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केळी रोपांवर लक्षणे:किडींच्या वाढीसाठी पोषक वातावरण ; त्यामुळे केळीवर सीएमव्हीचा प्रादुर्भाव

यावल17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यात केळी पिकावर सीएमव्हीचा प्रादुर्भाव आढळत आहे. या रोगावर नियंत्रणासाठी कृषी विभागाने मार्गदर्शन सूचना जाहीर केली आहे. त्यात प्रत्येक शेतकऱ्याने योग्य काळजी घेतली तर नुकसान टाळता येईल, असे तालुका कृषी अधिकारी एस.बी.सिनारे यांनी सांगितले.एस.बी.सिनारे यांनी सांगितले की, गेल्या १५ ते २० दिवसांपूर्वी सीएमव्ही या रोगाचा प्रसार करणाऱ्या किडींच्या वाढीसाठी ढगाळ वातावरण व कमी सूर्यप्रकाश असे पोषक वातावरण होते. त्यामुळे गेल्या आठवड्यापासून केळी रोपांवर लक्षणे दिसत आहे.

या रोगाचा प्रसार रसशोषण करणारे कीड मावा, तुडतुडे, थ्रीप्स, पांढरी माशी (व्हाईट फ्लाय) अशा किडीमार्फत गवतातून, एका झाडातून दुसऱ्या झाडात होतो. असे झाड असल्यास शेतकऱ्यांनी सर्वप्रथम रोग ग्रस्त केळी झाड उपटून नष्ट करावे. केळी बाग तणमुक्त ठेवावी, बागेत किंवा शेतीच्या बांधावरील सर्व गवत, केणा, चिव्वळ, घोळ, जंगली कारल्याचे वेल काढून नष्ट करावे. केळी बाग, बांधावर कोणतेही वेलवर्गीय पीक, मिरची, भाजीपाल्याची लागवड करू नये.

रोगावर नियंत्रणासाठी कृषी विभागाकडून टिप्स्
सीएमव्हीच्या नियंत्रणासाठी ६-७ दिवसांच्या अंतराने केळीवर फवारणी करावी. बागेच्या बांधावर देखील फवारणी करावी. रसशोषण करणारे कीटक नियंत्रणासाठी आपल्याकडे जे कीटकनाशक उपलब्ध असेल ते + अॅसिफेट + निंबोळी तेलाचा वापर करावा. किंवा बाजारात अनेक मिश्र कीटकनाशक उपलब्ध आहेत. त्यामध्ये अॅसेफेट १५ ग्रॅम, ३० ग्रॅम निंबोळी तेल प्रती १५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.आठवड्यापासून केळी रोपांवर लक्षणे दिसत आहे.

या रोगाचा प्रसार रसशोषण करणारे कीड मावा, तुडतुडे, थ्रीप्स, पांढरी माशी (व्हाईट फ्लाय) अशा किडीमार्फत गवतातून, एका झाडातून दुसऱ्या झाडात होतो. असे झाड असल्यास शेतकऱ्यांनी सर्वप्रथम रोग ग्रस्त केळी झाड उपटून नष्ट करावे. केळी बाग तणमुक्त ठेवावी, बागेत किंवा शेतीच्या बांधावरील सर्व गवत, केणा, चिव्वळ, घोळ, जंगली कारल्याचे वेल काढून नष्ट करावे. केळी बाग, बांधावर कोणतेही वेलवर्गीय पीक, मिरची, भाजीपाल्याची लागवड करू नये.

बातम्या आणखी आहेत...