आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वनवा:पालापाचोळा पेटवल्याने बियाणी मिलिटरी स्कूल परिसरामध्ये आग

भुसावळ4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील जामनेर रोडवरील बियाणी मिलिटरी स्कूल परिसरात बुधवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास अचानक आग आली. यामुळे शाळेच्या परिसरात धावपळ उडाली. पालिका अग्निशमन बंबाने ही आग आटोक्यात आणली. शाळेच्या आवारात पडलेला पाला-पाचोळा मजुरांनी पेटवल्याने हा प्रकार झाल्याचे पुढे आले.

बियाणी मिलिटरी स्कूलच्या प्रवेशद्वारापासून ते आतमध्ये जाणाऱ्या मार्गावर झाडांचा पालापाचोळा पडलेला होता. हा सुकलेला पालापाचोळा जमा करून तेथील चार ते पाच मजूर तो पेटवत होते. मात्र, नेमकी यावेळी जोरदार हवा सुटल्याने ही आग आजूबाजूला पसरली. त्यामुळे तातडीने पालिकेच्या अग्निशमन केंद्राला माहिती देण्यात आली. काही मिनिटांतच अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाला. वसंत पाटील, डिगंबर येवले, दिनेश पुरोहित, विजय मनोरे या कर्मचाऱ्यांनी पाण्याचा मारा करून पंधरा मिनिटात आग आटोक्यात आणली. मात्र, हवेचा वेग जास्त असल्याने त्यांना आग विझवताना चांगलेच परिश्रम घ्यावे लागले. दरम्यान, गेल्या पंधरवड्यात तापमान वाढल्यापासून शहरात आगीच्या घटना वाढल्या आहेत. नागरिकांनी खबरदारी घ्यावी.

बातम्या आणखी आहेत...