आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापोलिसांनी शुक्रवारी रात्री १० ते पहाटे २ वाजेपर्यंत म्हणजे चार तास शहरात काेम्बिग आॅपरेशन राबवले. त्यात ९ अटक वारंट व जामीनकीचे १४ वॉरंट बजावण्यात आले. मात्र, पाहिजे असलेल्या ज्या १६ संशयितांचा शोध घेण्यात आला, त्यापैकी केवळ एकच आरोपी मिळाला.डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी रात्री १० ते पहाटे २ वाजेपर्यंत भुसावळ शहर, बाजारपेठ व तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले.
बाजारपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक राहूल गायकवाड, शहरचे सहायक निरीक्षक विनाेदकुमार गाेसावी यांनी हे ऑपरेशन राबवले. त्यात ९ अटक वॉरंट बजावणी, १४ बेलेबल वॉरंट बजावणी, ७६ समन्स बजावण्यात आले. महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गंत ८ ठिकाणी छापे टाकून गुन्हे दाखल केले. तीन ठिकाणी जुगारावर छापे टाकले.
दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या ६ जणांवर वाहतूक शाखेने कारवाई केली. पोलिस ठाण्याच्या हद्दीत ३३ हिस्ट्रीसिटर्सची तपासणी केली. त्यातील २१ जण घरी सापडले. रात्री संशयितपणे फिरणाऱ्या एका जणास अटक झाली. तसेच पाहिजे असलेल्या १६ पैकी एकच संशयित सापडला. त्यास अटक झाली. इतर सापडले नाहीत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.