आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दंगल:किनगावात मुलींच्या भांडणातून झाली दंगल ; चुलत दीर व पतीसह इतरांना जबर मारहाण

यावल25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

किनगाव येथे अंगणवाडीत जाणाऱ्या लहान बालिकांचे भांडण, तर त्यातून मोठ्यांमध्ये वाद झाले. या वादात बालिकेच्या संतप्त आईने माहेरील लोक आणि तृतीयपंथींना सोबत घेत चुलत दीर व पतीसह इतरांना जबर मारहाण केली. या प्रकरणी दंगलीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला. भूषण शिवाजी साळुंखे यांच्या फिर्यादीनुसार त्यांच्या चुलत भावाच्या मुलीने अंगणवाडीत त्यांच्या मुलीस मारहाण केली. याचा जाब विचारण्यासाठी त्याची आई बालिकेच्या आईकडे गेली. बालिकेची आई मोना संदीप साळुंके हिने भूषणच्या आईला शिवीगाळ केली. त्यात वाद वाढला. नंतर मोनाचे पती संदीप साळुंके यांनी पत्नी मोना हिला कानशिलात मारली. याचा राग येत मोना साळुंखे ही जळगावला माहेरी निघून गेली. नंतर जळगाव येथील अयोध्या नगरातील तिचे वडील बाबूराव मेढे, भाऊ संजय बाबूराव मेढे, सुनीता बाबूराव मेढे, गणेश बापूराव मेढे व जळगावातील चार तृतीयपंथी हे सर्व किनगावात आले. त्यांनी फिर्यादी भूषण साळुंके, मोना हिचे पती संदीप साळुंखे, अर्चना साळुंके यांना मारहाण केली.

बातम्या आणखी आहेत...