आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:मोहराळा अन् हरिपुरा येथील 13 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल ;डोक्यावर फावड्याने दुखापत

यावलएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील हरिपुरा गावात लग्न समारंभात मंडप लावणाऱ्याच्या जावयाने एका मुलीचा मोबाइल क्रमांक मागितला. यातून गुरुवारी झालेल्या वादाची ठिणगी शुक्रवारी पुन्हा पडली. त्यात मोहराळा-हरिपुरा गावाचे नागरिक आपसात भिडत दंगल घडली. त्यात दोन गटातील ८ जण जखमी झाले. दोघांच्या परस्पर विरोधी फिर्यादीवरून १३ जणांवर दंगलीसह इतर कलमानुसार गुन्हे दाखल झाले. हरिपुरा येथील रमजान भायखाँ तडवी यांच्या फिर्यादीनुसार हरिपुरा येथे गुरुवारी त्यांच्या मुलीचे लग्न होते. लग्नात मोहराळा येथील उघडू तडवी (रा.मोहराळा) यांचे मंडप टाकले होते. हे मंडप काढण्यासाठी आलेला उघडू तडवी यांचा जावई (नाव माहिती नाही) याने एका मुलीला तिचा मोबाइल क्रमांक मागितला. त्यावरून वाद झाल्यावर हे भांडण आपसात मिटले होते. मात्र, शुक्रवारी फिर्यादीचा मुलगा अमजद रमजान तडवी मोहराळा येथे खाद्यपदार्थ घेण्यास गेला होता. तेथे मशिदी जवळ त्याला अयुब हसन तडवी व सोबतच्या पाच जणांनी मारहाण केली. फिर्यादी रमजान तडवी, आसिफ तडवी, शरीफ तडवी, सकुबाई भायखॉँ तडवी तेथे गेले असता त्यांना देखील मारहाण झाली. यात रमजान तडवी यांच्या डोक्यावर फावड्याने दुखापत करण्यात आली. या फिर्यादीवरून सहा जणांवर गुन्हा दाखल झाला. तपास उपनिरीक्षक विनोद खांडबहाले करत आहे. दुसऱ्या गुन्ह्यात मोहराळा येथील सलीम लुकमान नहाळ यांनी फिर्यादी दिली. ते शेतात काम करत असताना गावात भांडण होत असल्याचे समजले. हे भांडण सोडवण्यासाठी आल्यावर हरिपुरा येथील अमजद रमजान तडवी, शरीफ सुपडू तडवी, आसिफ सुपडू तडवी, सुपडू भायखाँ तडवी, रमजान तडवी व अजुनसोबत असलेल्या दोघांनी फिर्यादीच्या डोक्यावर उलट्या उऱ्हाडीने वार करून जखमी केले. सुलेमान रुबाब तडवी, सादिक सुलेमान तडवी यांना देखील मारहाण केली. सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. यावल पोलिस तपास करत आहे.

बातम्या आणखी आहेत...