आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपक्रम:रावेरातील विज्ञान प्रदर्शनात दिसली संशोधनवृत्तीची चुणूक; मॅक्रोव्हिजन अकॅडमीत आयोजन, विद्यार्थ्यांचा प्रतिसाद

ऐनपूर24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन श्रीराम फाउंडेशन संचालित मॅक्रो व्हिजन अकॅडमी, येथे नुकतेच करण्यात आले होते. आमदार शिरीष चौधरी यांच्याहस्ते उद्घाटन झाले.

गटविकास अधिकारी दिपाली कोतवाल, गटशिक्षणाधिकारी शैलेश दखणे, शिक्षण विस्तार अधिकारी रत्ना लोहार, विलास कोळी, प्राचार्य दीपक महाजन, परीक्षक प्रा.डॉ. अविनाश सोनार, प्रा.डॉ. एस. जी. चिंचोरे, व्ही.एस.नाईक वरिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. डॉ. डी बी पाटील, सरदार वल्लभभाई पटेल महाविद्यालय ऐनपूरचे संदीप पाटील, तालुका समन्वयक एस.आर. महाजन, तालुका सहसमन्वयक डी.आर.साळवे उपस्थित होते. पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती मातेचे व माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमांचे पूजन व दीप प्रज्वलन झाले. बालवैज्ञानिकांच्या प्रत्येक मॉडेलला भेट देऊन आमदारांनी माहिती जाणून घेतली. दुपारी बक्षीस वितरणाचा कार्यक्रम झाला. माध्यमिक मुख्याध्यापक संघाचे राज्याध्यक्ष जे.के. पाटील, गटशिक्षणाधिकारी शैलेश दखणे, शिक्षण विस्तार अधिकारी रत्ना लोहार, विलास कोळी व सर्व केंद्रप्रमुख उपस्थित होते. अकॅडमीचे अध्यक्ष श्रीराम पाटील, व्यवस्थापक स्वप्नील पाटील यांनी सहकार्य केले. सूत्रसंचालन नीलेश पाटील व कैलास घोलाने यांनी केले. आभार गणेश धांडे यांनी मानले.

चिनावल विद्यालयास शिक्षक गटात प्रथम क्रमांक
येथील नूतन माध्यमिक विद्यालयाचे उपशिक्षक के.आर. पाटील हे श्रीराम मॅक्रो विजन अकॅडमी रावेर, येथे नुकत्याच पार पडलेल्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात, शिक्षकांनी बनविलेले शैक्षणिक साहित्य गटात तालुक्यातून प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले. यानिमित्त त्यांना तालुक्याच्या बी.डी.ओ. दिपाली कोतवाल यांच्या हस्ते प्रशस्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांच्या साहित्याची जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली. यापूर्वीही त्यांनी विज्ञान प्रदर्शनात अनेकदा प्रथम क्रमांक मिळवला आहे. संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत सरोदे, चेअरमन विनायक महाजन, सेक्रेटरी गोपाळ पाटील, स्कूल कमिटी सदस्य दामोदर महाजन, मुख्याध्यापक एच.आर.ठाकरे, उपमुख्याध्यापक मीनल नेमाडे, पर्यवेक्षक पी.एम.जावळे यांनी त्यांचे अभिनंदन केले.

बातम्या आणखी आहेत...