आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिस्तूल प्रदर्शन:गहाळ हाेऊ नये म्हणून प्रदर्शनात निवडक शस्त्र‎ ; पाेलिस स्थापना दिनानिमित्त राबवला उपक्रम

जळगाव‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र पोलिस स्थापना‎ दिनानिमित्त जिल्हा पोलिस दल,‎ भंवरलाल अँड कांताबाई जैन‎ फाउंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशन‎ यांच्या संयुक्त विद्यमाने‎ काव्यरत्नावली चौक जळगाव येथे‎ बुधवारी शस्त्र, श्वान, बॉम्ब शोधक‎ व नाशक, पोलिस बॅन्ड, वायरलेस‎ इत्यादींचे प्रदर्शन आयोजित‎ करण्यात आले होते. दोन वर्षांपूर्वी‎ या प्रदर्शनातून एक पिस्तूल गहाळ‎ झाले होते. या संदर्भात रामानंदनगर‎ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल‎ करण्यात आला आहे. हे पिस्तूल‎ अद्याप मिळालेले नाही. या घटनेची‎ पुनरावृत्ती होऊ नये म्हणून यंदा‎ निवडक शस्त्र प्रदर्शनात ठेवण्यात‎ आल्याचे समेार आले आहे.‎ जिल्हाधिकारी अमन मित्तल,‎ पोलिस अधीक्षक एम. राजकुमार‎ यांच्याहस्ते हवेत तिरंगे फुगे सोडून‎ प्रदर्शनाचे उद‌्घाटन करण्यात आले. अप्पर पोलिस अधिक्षक चंद्रकांत ‎गवळी, पोलिस उपअधीक्षक‎ (गृह) संदीप गावित, युवाशक्ती ‎फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष‎ विराज कावडीया उपस्थित होते. ‎विविध शाळा महाविद्यालयातील ‎विद्यार्थी, शिक्षक, एनसीसी व ‎एनएसएसचे कॅडेट उपस्थित होते. ‎

जिल्हाधिकारी अमन मित्तल,‎ पोलिस अधीक्षक एम. राजकुमार‎ यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी‎ मार्गदर्शन केले. चंद्रकांत गवळी‎ यांनी प्रास्ताविक करून महाराष्ट्र ‎पोलिस स्थापना दिवसाचा इतिहास ‎ ‎ मांडला तर संदीप गावित यांनी‎ आभार मानले. कावडीया यांनी ‎आयोजनाची भूमिका स्पष्ट केली. ‎अमीत माळी यांनी सूत्रसंचालन‎ केले. सर्व पोलिस ठाण्यांचे निरीक्षक‎ या प्रदर्शनाला हजर होते.‎ यशस्वीतेसाठी संतोष सोनवणे,‎ मंगल पवार, ड्रील इन्स्ट्रक्टर देवीदास‎ वाघ, डी. वाय. मराठे, दीपक पाटील,‎ हरीष कोळी, राजेंद्र वाघ, किरण‎ सपकाळे यांनी सहकार्य केले.‎ प्रदर्शनात दक्षता म्हणून गर्दी‎ टाळण्यासाठी दाेऱ्या बांधण्यात‎ आलेल्या असल्याचे दिसून आले.‎शस्त्र प्रदर्शनात विद्यार्थिनींना शस्त्रांची माहिती देताना पाेलिस कर्मचारी.‎

ही शस्त्रे ठेवली प्रदर्शनात : प्रदर्शनात एके ४७, एसएलआर‎ रायफल, कार्बाइन ९ एमएम, अश्रुधूर साठा, पम्प अॅक्शन, ९ एमएम‎ पिस्टल, ग्लॉक पिस्टल, रिव्हॉलर, श्वान पथकातील डाॅबरमॅन व लॅबेडर‎ प्रजातीचे श्वान, वायरलेस प्रणाली, दंगा नियंत्रण पथकातील कमांडो,‎ इन्सास रायफल आदी पोलिस हाताळत असलेले शस्त्र व यंत्रणेचा‎ प्रदर्शनात समावेश हाेता. अतिशय सूक्ष्म नियाेजन करण्यात आले.‎ ही शस्त्रे ठेवली प्रदर्शनात : प्रदर्शनात एके ४७, एसएलआर‎ रायफल, कार्बाइन ९ एमएम, अश्रुधूर साठा, पम्प अॅक्शन, ९ एमएम‎ पिस्टल, ग्लॉक पिस्टल, रिव्हॉलर, श्वान पथकातील डाॅबरमॅन व लॅबेडर‎ प्रजातीचे श्वान, वायरलेस प्रणाली, दंगा नियंत्रण पथकातील कमांडो,‎ इन्सास रायफल आदी पोलिस हाताळत असलेले शस्त्र व यंत्रणेचा‎ प्रदर्शनात समावेश हाेता. अतिशय सूक्ष्म नियाेजन करण्यात आले.‎

बातम्या आणखी आहेत...