आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवाशांचे‎ हाल:पुण्यासाठी 17 पासून विशेष बस धावणार

भुसावळ‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई येथे शिंदे सेनेच्या दसरा‎ मेळाव्यासाठी भुसावळ एसटी‎ आगारातून ४० पैकी २० बसेस‎ आरक्षित केल्या होत्या. मंगळवारी‎ गेलेल्या या बसेस गुरुवारी उशिराने‎ भुसावळात परतल्या. यामुळे तीन‎ दिवसांनंतर आगाराच्या सर्व २३४‎ फेऱ्या पूर्ववत झाल्या. आता‎ दिवाळीसाठी १७ ऑक्टोबरपासून‎ पुण्यासाठी विशेष बसेस धावतील.‎

भुसावळ आगारातून ऐन दसरा सणाच्या काळात‎ शिंदे सेनेच्या मेळाव्यासाठी निम्मे‎ बसेस मुंबईला पाठवल्याने प्रवाशांचे‎ हाल झाले. मुंबईमध्ये गेलेल्या बसेस‎ गुरुवारी सायंकाळी परत आल्या.‎ त्यामुळे शुक्रवारपासून बसेस‎ त्यांच्या नियोजित वेळापत्रकानुसार‎ धावण्यास सुरुवात झाली. दिवसभरात २३४ फेऱ्या झाल्या.

बातम्या आणखी आहेत...