आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मान्सून पूर्व तयारी:बचाव साहित्य तपासणीसह तीन महिने पुरेल एवढा औषधसाठा तयार ठेवावा ; आढावा बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणासह सर्व संबंधित विभागांची मान्सून पूर्व तयारीच्या आढावा बैठक जिल्हाधिकारी व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. अभिजीत राऊत यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच झाली. यात जिल्हा व तालुकास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करावे, विसर्गाची माहिती दर तासाला द्यावी, साथीचे आजारासह विविध औषधांचा तीन महिने पुरेल एवढा साठा तयार ठेवावा, शोध-बचाव साहित्याची तपासणी करुन घ्यावी याबाबत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. बैठकीच्या सुरुवातीला आपत्ती व्यवस्थापन विभागातर्फे तयार करण्यात आलेले पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे माहिती देण्यात आली. निवासी उपजिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अधिकारी यांनी जिल्हयातील सर्व विभागांनी मान्सून पूर्व काळात करावयाचे कामकाज, उपाययोजना व मान्सून काळात घ्यावयाची दक्षता याअनुषंगाने विभागनिहाय सोपवण्यात आलेली जबाबदारीबाबत माहिती दिली. शोध बचाव साहित्यांची तपासणी जिल्ह्यातील सर्व नगरपरिषद, महापालिकेला जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत वितरीत केलेल्या शोध व बचाव साहित्याची तपासणी अधिकाऱ्यांनी करावी. मेगा फोनचा वापर आपत्कालीन प्रसंगी नागरिकांना सावधानतेबाबत, दक्षता व अफवाबाबत सूचना देणे कामी करावा. पर्जन्यमापक यंत्राची तपासणी करावी. नैसर्गिक आपत्ती प्रसंगी अधिकारी व कर्मचारी यांनी पूर्व परवानगी शिवाय मुख्यालय सोडू नये. तापी, पूर्णा, गिरणा, वाघूर या प्रमुख नद्याच्या पात्रात अतिवृष्टी, पूर यामुळे पाण्याच्या पातळी वाढण्याबाबत नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्याची व्यवस्था करावी.

बातम्या आणखी आहेत...