आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यावलमध्ये झाडाझडती:खासदार निधीतील ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची अचानक तपासणी

यावल2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोना साथीच्या काळात खासदार रक्षा खडसे यांच्या निधीतून विविध ग्रामीण रुग्णालयांना यंत्रसामग्री उपलब्ध करून दिली होती. त्याची पडताळणी सुरू झाली आहे. यावल ग्रामीण रुग्णालयात निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या विशेष पथकाने येथे प्राप्त १६ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची तांत्रिक व अन्य प्रकारे तपासणी केली. हे सर्व ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर हे विनावापर खोक्यात बंद होते. यापू्र्वी रावेर येथेही तपासणी झाली होती. या सर्व ठिकाणचा गोपनीय अहवाल सोमवारी शासनाला सादर करण्यात येणार आहे.

गेल्या वर्षी कोरोना संकटात ऑक्सिजन पुरवठा मंदावला होता. त्या वेळी पर्यावरणातून नैसर्गिक रित्या ऑक्सिजन संकलनासाठी खासदार रक्षा खडसे यांच्या स्थानिक विकास निधीतून ग्रामीण रुग्णालयांना ऑक्सिजन कॉन्संट्रेटर वितरित करण्यात आले होते. याबाबत जिल्हा नियोजन मंडळाकडे तक्रार प्राप्त झाली होती. ऑक्सिजन कॉन्संट्रेटर वितरित झालेले नाहीत, त्यांचे कागदोपत्री वाटप झाले. त्यात गैरप्रकारांचे आरोप होते.

बातम्या आणखी आहेत...