आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रिकेट स्पर्धा:एकूण 16 संघांचा सहभाग, पहिले बक्षिस 31, तर दुसरे 15 हजारांचे‎

फैजपूर‎24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात आफताब क्रिकेट‎ अकादमीतर्फे आयोजित श्रीराम‎ पाटील चषक क्रिकेट स्पर्धेला‎ माेठ्या उत्साहात सुरुवात झाली.‎ श्रीराम ग्रुपचे अध्यक्ष श्रीराम पाटील‎ यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन‎ झाले.‎ तीन दिवसीय स्पर्धेचा अंतिम‎ सामना ६ जानेवारी रोजी होणार‎ आहे. येथील भुसावळ राेडवरील‎ मधुकरराव चाैधरी स्टेडियममध्ये‎ रंगलेल्या या स्पर्धेत १६ संघ‎ सहभागी झाले आहेत.

त्यात‎ स्पर्धेचे पहिले बक्षीस ३१ हजार‎ रुपये व चषक तर दुसरेे बक्षीस १५‎ हजार व चषक असे अाहे.‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ उद्घाटन समारंभात श्रीराम पाटील‎ यांचा सत्कार जफर अली यांच्या‎ हस्ते करण्यात आला.‎ यावेळी शहराचे माजी प्रभारी‎ नगराध्यक्ष शेख कुर्बान, माजी‎ नगरसेवक शेख जफर, वसीम‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ जनाब, फारुख शेख, मुदस्सर‎ नजर, रियाज भाई, इम्रान पटेल‎ उपस्थित होते. जफर अली, शेख‎ मोहसीन, आकीब खान, शेख‎ वकार, शाहरुख बेग, अर्शद‎ पिंजारी यांनी परिश्रम घेतले.‎

बातम्या आणखी आहेत...