आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

१८ विद्यार्थ्य्यांची पाठ‎‎:दहावीच्या हिंदीच्या पेपरला‎ एकूण 44 विद्यार्थ्यांची दांडी‎

भुसावळ‎23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुधवारी दहावीचा हिंदी विषयाचा पेपर होता.‎ त्याला ४४ विद्यार्थ्यांनी दांडी मारली. तर‎ बारावीच्या बाॅयोलाॅजीच्या पेपरला १८‎ जणांनी दांडी मारली. दरम्यान, दहावीच्या‎ हिंदीच्या पेपरला काही ठिकाणी कॉपी झाली.‎ सध्या दहावी व बारावीच्या परीक्षा सुरू‎ आहे. बुधवारी दहावीचा हिंदी व संयुक्त‎ हिंदी विषयाचा पेपर शहरातील सात केंद्रावर‎ झाला. त्यासाठी एकुण २,५९३ विद्यार्थ्यांची‎ बैठक व्यवस्था केली हाेती.

प्रत्यक्षात २,५४९‎ विद्यार्थ्यांनी पेपर दिला. ४४ परीक्षार्थी‎ गैरहजर हाेते. तर बारावीच्या बाॅयोलाॅजीच्या‎ पेपरला १,३७१ परीक्षार्थींची बैठक व्यवस्था‎ हाेती. १,३५३ विद्यार्थ्यांनी पेपर दिला तर १८‎ जणांनी दांडी मारली. शहरातील विविध‎ परीक्षा केंद्रावर बुधवारी जळगाव येथील‎ भरारी पथक आले हाेते. पण, कुठेही कॉपी‎ केस झाली नाही.‎

बातम्या आणखी आहेत...