आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कामसिद्ध महाराज:रोझोदा, थोरगव्हाणला‎ दोन दिवसांचा यात्रोत्सव‎

सावदा‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथून जवळच असलेल्या रोझोदा व‎ थोरगव्हाण या दोन गावांमध्ये‎ शनिवारी व रविवारी दोन दिवस‎ यात्रा भरणार आहे. रोझोदा येथे‎ पुरातन कामसिद्ध महाराजांची मंदिर‎ असून, तेथे श्री कामसिद्ध‎ महाराजांची यात्रा भरणार आहे.‎ त्यामुळे दोन दिवस मोठ्या संख्येने‎ भाविक नवस मानण्यासाठी व‎ फेडण्यासाठी हजेरी लावतात.‎ शनिवारी जल्लोषात काठी‎ मिरवणूक निघून कामसिद्ध देवांची‎ पूजाअर्चा होते. तसेच गावातील‎ मंदिरांना आमंत्रण देऊन मोठ्या‎ जल्लोषात यात्रेला दोन दिवसीय‎ यात्रेला सुरुवात होते. यात्रेची जय्यत‎ तयारी पूर्ण झाली आहे. कामसिद्ध‎ ट्रस्टचे सदस्य यात्रेची तयारी पूर्ण‎ करत आहेत.

तसेच थोरगव्हाण येथे‎ श्री भैरवनाथ महाराजांची दोन‎ दिवशीय यात्रा शनिवार व रविवारी‎ भरणार आहे. येथेही भैरवनाथाचे‎ पुरातन मंदिर असून, शनिवारी काठी‎ मिरवणूक जल्लोषात निघणार आहे.‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ तसेच मुकूट मिरवणूक निघून देवास‎ चांदीचा मुकुट परिधान केला जातो.‎ दुसऱ्या दिवशी तोरण तोडण्याचे‎ काम जल्लोषात होते. यावेळी‎ कालभैरवनाथ महाराजांचा जयघोष‎ केला जातो. या ठिकाणी मोठ्या‎ संख्येने भाविक नवस मानतात. तर‎ ज्यांचे नवस पूर्ण झाले ते यथाशक्ती‎ दान करतात. दोन्ही गावातील‎ यात्रांना या परिसरात महत्त्व आहे.‎ भाविकांनी यात्रेत सहभागी व्हावे व‎ दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन‎ थोरगव्हाण व रोझोदा मंदिर ट्रस्टींनी‎ केले आहे.‎

बातम्या आणखी आहेत...