आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जबर दुखापत:धरणगावात अँपेरिक्षाला वाहनाची धडक, युवक ठार

धरणगाव3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अँपेरिक्षाला मागून अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे, रिक्षाचालक युवक ठार झाला. धरणगाव-चोपडा रोडवरील कमल जिनिंगजवळ रविवारी सकाळी हा अपघात झाला. भावडू उर्फ आशिष गजानन भावसार (वय ३२, रा. पारोळा नाका, धरणगाव) असे मृताचे नाव आहे. आशिष हा ग्रामीण भागात किरकोळ धान्य विक्रीचा व्यवसाय करत होता. नेहमीप्रमाणे रविवारी तो व्यवसायासाठी जात होता. सकाळी ८.३० वाजता त्याची अॅपेरिक्षा (क्र.एम.एच.१५-ई.जी.६३०५)चोपडा रोडवरील कमल जिनिंगजवळ अचानक बंद पडली. त्याचवेळी मागून भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने अॅपेरिक्षाला जोरदार धडक दिली. यात अशिषच्या डोक्याला व पायाला जबर दुखापत झाली. जळगाव येथे नेत असताना त्याचा वाटेतच मृत्यू झाला.

बातम्या आणखी आहेत...