आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागुजरातमधून यावलमार्गे छत्तीसगड राज्यात जाणाऱ्या कुटुंबीयांमधील २० वर्षीय गरोदर महिलेला, सोमवारी पहाटे अचानक प्रसुती वेदना सुरू झाल्या. यावल शहरात आल्यानंतर या कुटुंबियांनी महिलेला ग्रामीण रुग्णालयात आणले. प्रसुती वेदना प्रचंड वाढलेल्या असताना, कागदपत्रे, नाव, पत्ता न विचारता, डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी पहाटे ६ वाजता या महिलेची सुखरुप प्रसुती केली. ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या माणुसकीमुळे या कुटुंबियांनी पाणावलेल्या डोळ्यांनी आभार मानले.
छत्तीसगडमधील रायगड जिल्ह्यातील पटेल पाली येथील नट कुटुंबीय, सोमवारी गुजरातमधून एका वाहनाने आपल्या गावी जात होते. यावल शहरात या कुटुंबातील गरोदर प्रियंका काजू नट (वय २०) या गरोदर महिलेस प्रसुती कळा सुरू झाल्या. पहाटे पाच वाजता या कुटुंबियांनी यावल शहर येताच नागरिकांना दवाखान्याचा पत्ता विचारला. काही नागरिकांनी त्यांना यावल ग्रामीण रुग्णालयात पाठवले. रुग्णालयात महिलेस थेट प्रसुती कक्षात नेले. त्या ठिकाणी महिलेने कन्यारत्नाला जन्म दिला. नवजात बाळ व माता दोघे सुखरुप आहेत. रुग्णालयात डॉ. सचिन देशमुख, अधिपरिचाका मंजुषा कोळेकर, ज्योत्स्ना निंबाळकर, नेपाली भोळे, सुमन राऊत आदींनी सहकार्य केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.