आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; संशयित पसार

यावल4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील डांभुर्णी येथून फूस लावुन पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाले. यानंतर तिला यावल येथे सोडून संशयित पसार झाला. संशयिताने सुरत येथे अत्याचार केल्याचे पीडितेने पोलिसांना सांगितले. त्यामुळे या अपहरणाच्या गुन्ह्यात पोस्को कायद्याचे कलम वाढवण्यात आले.

गावातीलच नीलेश कुंभार याने मुलीस पळवले होते. या प्रकरणी यावल पोलिसांत अपहरणाचा गुन्हा दाखल होता. तपास सुरू असताना बुधवारी अल्पवयीन मुलगी पोलिस ठाण्यात धडकली. तिने नीलेश याने सुरत येथे नेऊन अत्याचार केले. बुधवारी तिला यावल शहरातील भुसावळ टी पॉइंट जवळ सोडून पळ काढल्याचे सांगितले. याप्रकरणी संशयित कुंभारविरूद्ध अपहरणाच्या गुन्ह्यात पोस्को व लैंगिक अत्याचाराचे कलम वाढवण्यात आले. पीडितेची वैद्यकीय तपासणी करून जळगाव येथे बालकल्याण समितीकडे पाठवण्यात आले. संशयित नीलेश कुंभार याचा शोध सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...