आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रक-मॅक्झिमोत धडक:धानोरा-देवगाव रस्त्यावर अपघात , ९ प्रवासी जखमी; , पाच जणांची प्रकृती गंभीर

धानोराएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

चोपडा तालुक्यातील धानोरा ते देवगाव दरम्यान आयशर ट्रक व मॅक्झिमो गाडी यांच्यात जोरदार धडक होऊन अपघात झाला. यात नऊ जखमी झाले, त्यापैकी पाच जणांची प्रकृती गंभीर आहे. बुधवारी दुपारी हा अपघात झाला.मॅक्झीमो गाडीतील सात ते आठ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर धानोरा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार केले.

आयशर ट्रक (एम.एच.६३-सी.४७४७) चोपडाहून जळगावकडे जात होती. धानोरा गावजवळ जितेंद्र महाजन यांच्या शेताजवळ जळगावकडून चोपडाकडे प्रवासी घेऊन जाणारी मॅक्झिमो (एम.एच‌.१९ बी.यु.४९७७) यांच्यात दुपारी साडेबाराच्या सुमारास जोरदार धडक झाली. या अपघातात एकूण नऊ जण जखमी झाले आहेत. तर पाच जण गंभीर जखमी असून त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. आयशर चालक व क्लीनर पसार झाले आहेत. जखमींमध्ये मनोज गवळी, घनश्याम आडळकर, नितीन सोनवणे (रा.जळगाव) तसेच श्रीराम सुरेश, बन्सी सुरेश (रा.धवली) शोभा आढळके यांचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...