आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:खोलगट गटारीमुळे होताहेत अपघात

वरणगाव24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहराच्या विविध प्रभागात सांडपाण्याचा निचरा व्हावा यासाठी पालिकेच्या माध्यमातून गटारीचे बांधकाम झाले आहे. या गटारी खोल असून त्यांच्या आजूबाजूला गवत वाढल्याने नजरेस पडत नाही. नुकतीच एक म्हैस या गटारीत पडून जायबंदी झाली.

वरणगाव शहरातील विविध प्रभागांमधील सांडपाण्याचा योग्य निचरा व्हावा यासाठी गटारींचे बांधकाम करण्यात आले आहे. लोकप्रतिनिधींच्या शिफारसीनुसार सम्राट नगरात देखील अशी गटार बांधली आहे. काँक्रीटच्या या गटारीची रुंदी तीन फूट तर उंची चार फूट आहे. मात्र, पावसामुळे अनेकांचे खुले प्लाॅट व गटारीच्या आजूबाजूला गवत, झाडेझुडपे वाढली आहेत. त्यामुळे गटार नजरेत पडत नाही. यामुळे गटारात पडून अपघाताच्या घटना वाढल्या आहेत. हा प्रकार वेळप्रसंगी जीवावर देखील बितण्याची शक्यता नाकारता येत नाही. मध्यंतरी सम्राट नगर परिसरात एक गुराखी त्याची गुरे चारत होता. यावेळी एक म्हैस गटारात पडून जखमी झाली. रहिवाशांनी शर्तीचे प्रयत्न करून खोलगट गटारात अडकलेल्या म्हशीला बाहेर काढले. पालिकेने या गटारीची उंची वाढवावी किंवा स्वच्छता करावी, अशी मागणी आहे.

बातम्या आणखी आहेत...