आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थर्स्टी फर्स्टला रस्त्यावर:झिंगाट झालेल्या 162 ‘तळीरामां’वर कारवाई

भुसावळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

थर्स्टी फर्स्टला रस्त्यावर उतरलेल्या पोलिसांनी मद्यपान करून वाहन चालवणे (ड्रंक अँड ड्राइव्ह), ट्रिपल सीट, विना नंबर प्लेटचे वाहन चालवणे, अल्पवयीन व वाहन परवाना नसलेल्या १६२ जणांवर कारवाई केली. ३१ डिसेंबरला रात्री ९ ते पहाटे ५ वाजेपर्यंत ही कारवाई चालली. त्यासाठी पोलिसांनी ७ ठिकाणी नाका बंदी केली होती. नवीन वर्षाचे स्वागत आनंद व उत्साहाने करता यावे, कोणताही अनुचित प्रकार घडू नये सोबत नियम मोडणाऱ्यांवर कारवाई व्हावी यासाठी पोलिस प्रशासनाने शुक्रवारपासूनच कारवाईची मोहीम हाती घेतली होती.

त्यात थर्टी फर्स्टच्या रात्री ४९ जण मद्यपान करून वाहन चालवताना आढळले. त्यांच्यावर मोटार वाहन कायदा कलम १८५ नुसार ड्रंक अँड ड्राईव्हची कारवाई झाली. ३ अल्पवयीन मुलेदेखील नशेत गाडी चालवताना सापडले. त्यांच्या पालकांवर कारवाई करून न्यायालयात खटला पाठवण्यात येईल. महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ८४ खाली १३ व्यक्तींवर गुन्हा दाखल झाला.

बातम्या आणखी आहेत...