आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानिंभोरा दरवर्षी नवीन वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे १ जानेवारी या दिवशी सर्वत्र जल्लोषाचे वातावरण असताना निंभोरा येथील तरुणांनी मात्र यंदाही वाघोदा रस्त्यावरील स्मशानभूमी परिसरात स्वच्छता मोहीम राबवली. यावेळी गावातील स्वानंद कृषि विज्ञान मंडळ व युवाशक्ति मित्र परिवाराचे कार्यकर्ते व गावातील युवा सहकारी उपस्थित होते.
नवीन वर्षाची सुरुवात नागरिकांना स्वच्छतेचा संदेश देऊन करावी, असा निर्णय अर्थात संकल्प युवाशक्ति मित्र परिवाराने पाच वर्षांपूर्वी घेतला होता. आणि तेव्हापासून दरवर्षी न चुकता संकल्प पूर्ण करू, असा निर्धार मनाशी बाळगून सातत्याने हा उपक्रम राबवण्यात येत असताे. यावेळी स्मशानभूमीत वाढलेली झाडेझुडपे, अस्ताव्यस्त पडलेली दशक्रिया विधीचे अर्धवट, वापरलेले साहित्य, शाल, पुष्पहार यांची विल्हेवाट लावण्यात आली. तर पालापाचोळा संकलित करण्यात येऊन ताे जाळण्यात अाला. या स्वच्छता मोहिमेत येथील गुणवंत भंगाळे, रवींद्र भोगे, सुनील कोंडे, विवेक बोंडे, नीलेश लोखंडे, दिलीप खैरे, हर्षल ठाकरे, राज खाटीक, पीयूष बऱ्हाटे, गौरव काटोले, एकनाथ धनगर यांच्यासह परिसरातील इतर तरुण या वेळी उपस्थित हाेते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.