आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउषा नॅशनल रिसर्च सायन्स सेंटर, एपीजे अब्दुल कलाम नॅशनल कौन्सिल ऑफ यंग सायंटिस्ट इंडिया, वरणगाव येथील एपीजे अब्दुल कलाम विपनेट क्लबच्या माध्यमातून शहरातील इंद्रप्रस्थ नगरात ४० विद्यार्थी, ७ शिक्षकांनी दुर्बिणीने चंद्रग्रहणाची खगोलीय घटना अनुभवली. पुढील तीन वर्षे अशी कोणतीही खगोलीय घटना दिसणार नाही, अशी माहिती अभ्यासक शिवम भंगाळे यांनी विद्यार्थ्यांना दिली.
चंद्रग्रहण अभ्यासवर्गाला चांगला प्रतिसाद मिळाला. खगोल अभ्यासक शिवम भंगाळे यांच्या दुर्बिणीतून विद्यार्थ्यांनी चंद्रगहण या खगोलीय घटनेची माहिती जाणून घेतली. भुसावळ शहरात सायंकाळी ५.५७ वाजता हे चंद्रग्रहण दिसले. ब्रह्मांडामध्ये विविध ग्रह आहेत. यापैकी पृथ्वी या ग्रहावर सजीवांना जीवन जगण्यासाठी पोषक वातावरण आहे. तसेच ब्रह्मांडामध्ये दररोज विविध घटना घडतात, त्याकडे अंधश्रद्धा म्हणून नव्हे तर विज्ञानाच्या नजरेतून कुतूहलाने पाहावे. निसर्गात घडणाऱ्या घटनांची कारणमीमांसा करावी, असा सल्ला शिवमने विद्यार्थ्यांना दिला.
शिक्षकांचा पुढाकार शहरातील खगोल अभ्यासक शिवम भंगाळे यांच्या माध्यमातून विज्ञानाची आवड असलेल्या विद्यार्थ्यांना चंद्रग्रहण अनुभवता यावे यासाठी जीवन महाजन, दिलीप जावळे, शैलेंद्र भंगाळे, धीरज चौधरी, समाधान जाधव, भूषण झोपे, तेजेंद्र महाजन या शिक्षकांनी पुढाकार घेतला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.