आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रशिक्षणार्थ्यांनी प्रवेश घेतला:पहिल्या फेरीत आयटीआयच्या ३८०पैकी २०५ जागांवर प्रवेश

भुसावळ7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील जामनेर राेडवरील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत, विद्यार्थ्यांच्या प्रवेश अर्जांची छाननी हाेऊन पहिल्या फेरीत ५३ टक्के जागा भरल्या गेल्या. आता विद्यार्थ्यांचे लक्ष दुसऱ्या फेरीकडे लागले आहे. एकूण ३८०पैकी २०५ जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला.औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत एक वर्ष मुदतीच्या एकूण जागा १९६, तर दोन वर्ष मुदतीच्या १८४ जागा आहेत. पहिल्या प्रवेश फेरीत एक वर्षा मुदतीच्या ट्रेडसाठी ९३ प्रशिक्षणार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.

तसेच दोन वर्ष मुदतीच्या ट्रेडसाठी पहिल्या प्रवेश फेरीत ११२ प्रशिक्षणार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. पहिल्या प्रवेश फेरीत ५३ टक्के जागा भरल्या गेल्या. यामुळे विद्यार्थ्यांचे लक्ष आता दुसऱ्या फेरीकडे लागले आहे. आयटीआय केल्यानंतर कंपन्यांमध्ये तात्काळ नाेकरी मिळते. तसेच स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध होते. त्यामुळे आयटीआयकडे विद्यार्थ्यांचा कल अधिक आहे. खासगी संस्थांमध्येही अनेक विद्यार्थी प्रवेश घेत आहेत.

बातम्या आणखी आहेत...