आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्या:भुसावळच्या म्हाडा कॉलनीत चिट्ठी लिहित प्रौढाची आत्महत्या; वादातून पत्नी माहेरी गेल्याने उचलले टोकाचे पाऊल

भुसावळ16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘पूजा मला मुलांनाही मारायचे होते. पण, मारण्याची ताकद नाही म्हणून त्यांना सोडून दिलं. कारण माझ्या ओम आणि चेतनला तू बघितलंय मी किती प्रेम करतो ते. आणि तुझ्यावर पण तेवढचं प्रेम करतो. तू मला फोनवर बोलली मी नाही येणार, म्हणूनच मी हे पाऊल उचललं आहे.’ अशी चिठ्ठी लिहून हुडकोमधील म्हाडा कॉलनीतील रहिवासी श्रीकृष्ण उर्फ पंकज संतोष ठाकरे (वय ३६) यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी सकाळी सात वाजेपूर्वी घडली.

काही वाद झाल्याने श्रीकृष्णची पत्नी माहेरी धरणगाव येथे निघून गेली होती. यानंतर श्रीकृष्णने मंगळवारी तिला फोन कॉल केला. मात्र, पत्नीने येण्यास नकार दिला. याच संतापात श्रीकृष्ण ठाकरे यांनी राहत्या घरातील किचनमध्ये बुधवारी सकाळी ७ वाजेपूर्वी आेढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली. भुसावळ शहर पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक दिलीप चौधरी घटनास्थळी आले. पंचनामा करून मृतदेह विच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला. माजी नगरसेवक दीपक धांडे, सतीश सपकाळे आदी उपस्थित होते.

मुलाचा आईला फोन
ठाकरे यांना चार वर्षे आणि दोन वर्षांची दोन मुले आहेत. यातील चार वर्षांच्या मुलाने रात्री १.३० वाजता फोन करून बाबा गेल्याची माहिती दिल्याचे त्याच्या आईने भुसावळ येथे आल्यावर सांगितले. तर गळफास घेतल्यानंतर वडील जणू उभेच आहेत असे समजून लहान मुलगा त्यांच्या पायाला बिलगला.

बातम्या आणखी आहेत...