आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभियान‎:विद्यार्थिनींसाठी‎ साहसी‎ अभियान कार्यशाळा‎ ; डी.एन. कॉलेजमध्ये 8 ते 13 या काळात आयोजन‎

फैजपूर‎13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर‎ महाराष्ट्र विद्यापीठाचा विद्यार्थी‎ विकास विभाग व धनाजी नाना‎ महाविद्यालयातील विद्यार्थी विकास‎ विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने,‎ युवतींसाठी ८ ते १३ मार्च या काळात‎ मिशन साहसी अभियान‎ कार्यशाळेचे आयोजन करण्यात‎ आले होते.‎ उद्घाटन प्राचार्य डॉ.लता मोरे,‎ शिक्षण शास्त्र महाविद्यालय खिरोदा‎ यांच्याहस्ते झाले. त्यांनी महिला व‎ स्वयंरोजगार या विषयावर विचार‎ मांडले. तिसऱ्या दिवशी डॉ.सतीश‎ चौधरी यांनी महिला व समान संधी‎ या विषयावर मार्गदर्शन केले.‎ सूत्रसंचालन माधुरी भरणे हिने यांनी‎ आभार दिव्या वानखेडे यांनी मानले.‎ दुसऱ्या दिवशी प्राचार्य‎ डॉ.पी.आर.चौधरी यांनी‎ स्त्रियांमधील धैर्य व स्वतःच्या‎ हक्कांविषयी जागरूकता निर्माण‎ करण्यासाठी अशा प्रकारच्या‎ शिबिराची गरज आहे, असे‎ सांगितले.

डॉ.प्रियदर्शनी सरोदे यांनी‎ ''महिलांचा आहार व आरोग्य व‎ त्यावर उपाययोजना हा विषय‎ मांडताना युवतींनी स्वतःची‎ शारीरिक व मानसिक काळजी कशी‎ घ्यावी, त्याचबरोबर बदलत्या‎ वयाप्रमाणे त्यांना आवश्यक त्या‎ आहाराचा उपयोग कसा करावा‎ याविषयी मार्गदर्शन केले. उपप्राचार्य‎ प्रा.डी.बी.तायडे यांनी युवतींनी‎ सावित्रीबाईचा वारसा पुढे‎ चालवायचा आहे. त्यांची प्रेरणा‎ घेऊन आयुष्यात शिक्षणात कसे‎ अग्रेसर व्हावे हे सांगितले. तसेच‎ युवतींनी श्रद्धा जरूर जोपासावी पण‎ अंधश्रद्धा बाजूला ठेवावी असे‎ आवाहन केले. सूत्रसंचालनमहेक‎ तडवी यांनी केले, आभार रोहिणी‎ माळी या विद्यार्थिनीने मानले.‎ प्रास्ताविक डॉ.कल्पना पाटील यांनी‎ केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी‎ विद्यार्थी विकास अधिकारी‎ डॉ.जी.जी कोल्हे, डॉ.राजश्री‎ नेमाडे, डॉ.सविता वाघमारे,‎ डॉ.जयश्री पाटील, डॉ.सीमा बरी,‎ डॉ.पल्लवी भंगाळे, प्रा.नाहीदा‎ कुरेशी, प्रा.शुभांगी पाटील यांनी‎ सहकार्य केले. साहसी अभियान‎ कार्यशाळेच्या माध्यमातून‎ विद्यार्थिनींनी विविध विषयांवर‎ मार्गदर्शन मिळाले. तसेच त्यांच्या‎ शंकांचे निसरन झाले.‎

बातम्या आणखी आहेत...