आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी‎:श्रद्धा वालकरची हत्या करणाऱ्या‎ आफताबला तत्काळ फाशी द्यावी‎

भडगाव‎14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वसई येथील श्रद्धा वालकरची‎ दिल्ली येथे निर्घृणपणे हत्या‎ करणाऱ्या नराधम आरोपी आफताब अमिन पूनावाला यास फाशी द्या,‎ अशी मागणी महिला दक्षता समितीने ‎केली आहे.‎ श्रद्धा वालकर हिचा गळा दाबून नराधम आरोपी आफताबने दिल्ली‎ येथे निर्घृणपणे हत्या करून अत्यंत कृरतेने शरीराचे ३५ तुकडे केले हाेते त्यानंतर ते तुकडे एक-एक करून ‎मेहरौली जंगलात तसेच शहराच्या‎ अनेक भागात फेकून दिले हाेते.‎

अत्यंत संतापजनक या घटनेचा‎ खटला फास्ट ट्रक काेर्टात चालवून‎‎ नराधम आरोपीला तत्काळ फासावर‎ लटकवा, अशा मागणीचे निषेध‎ निवेदन भडगाव पोलिस ठाण्यात‎ दक्षता समिती अध्यक्षा योजना‎ पाटील, उपाध्यक्षा मीना बाग,‎ सदस्या रेखा पाटील, चंदा पाटील,‎ अलका कोळी, मनीषा सावळे आदी‎ महिला सदस्यांनी दिले.‎

बातम्या आणखी आहेत...