आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाहणी‎:अतिक्रमणाच्या तक्रारीनंतर तीन‎ सदस्यांच्या समितीने केली पाहणी‎

भुसावळ‎17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील नवशर्क्ती अार्केडजवळील‎ रस्त्यावरील अतिक्रमण, पांडुरंग‎ टाॅकीजजवळून दगडी पुलाकडे‎ जाणाऱ्या रस्त्यावरील सार्वजनिक‎ शाैचालयाच्या असलेल्या तक्रारीची‎ दखल घेत, अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण‎ महाजन, टाऊन प्लॅनिंगचे जनार्दन‎ पवार, सहायक संचालक राजेश पाटील‎ यांनी शनिवारी पाहणी केली.‎ दगडी पुलाकडे जाणाऱ्या मार्गावरील‎ सार्वजनिक शाैचालयाच्या‎ अस्वच्छतेबाबत व रस्त्याबाबत तेथील‎ रहिवाशांनी लाेकायुक्तांकडे तक्रारी‎ केल्या हाेत्या.

याबाबत जिल्हाधिकारी‎ अमन मित्तल यांनी तीन अधिकाऱ्यांची‎ समिती स्थापन करून, प्रत्यक्ष पाहणीचा‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ अहवाल सादर करण्याच्या सूचना‎ दिल्या होत्या. त्यानुसार शनिवारी ही‎ समिती शहरात सकाळी ११ वाजता‎ दाखल झाली हाेती. अप्पर‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ जिल्हाधिकाऱ्यांनी तक्रारदारांशी चर्चा‎ केली. पालिकेकडून हाेणाऱ्या‎ उपाययाेजनेबाबत अभियंत्यांशी चर्चा‎ केली.

बातम्या आणखी आहेत...