आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिलासा:पाच महिन्यानंतर पावणेदोन लाख भुसावळकरांना मिळेल शुद्ध पाणी

भुसावळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहराला पाणीपुरवठा करणारी सन १९५८ मधील पाणीपुरवठा योजना कालबाह्य झाली. या योजनेचे पुनरुज्जीवन वैशिष्ट्यपूर्ण कामे योजनेच्या ५ कोटी ७९ लाख रुपये निधीतून अखेर सुरु झाले आहे. त्यात नवीन सँड फिल्टर, ड्रेनेज यंत्रणा, १२ एमएलडी क्षमतेच्या क्लोरिफाक्युरेटरचे नूतनीकरण, १०० अश्वशक्तीचा नवीन पंप, संपूर्ण इलेक्ट्रिफिकेशन, १२ ठिकाणी व्हॉल्व्ह बसवणे अशी कामे मार्च २०२३ पर्यंत पूर्ण केली जातील. यामुळे शहरातील १ लाख ८७ हजार नागरिकांना पाच महिन्यानंतर शुद्ध व मुबलक पाणी मिळेल.

शहरात सद्यःस्थितीत पाणीपुरवठा करणारी यंत्रणा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने १९५८ मध्ये उभारली होती. ३० वर्षांचे आयुर्मान असलेली ही योजना सन १९८८ मध्ये कालबाह्य झाली.

वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून निधी, अडचण सुटली
अमृत योजनेला विलंब होत असल्याने शहरात शुद्ध पाणीपुरवठ्यासाठी सध्याच्या कालबाह्य यंत्रणेची दुरुस्ती गरजेची होती. यामुळे वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून निधीसाठी पाठपुरावा केला. प्रस्तावाला मंजुरी मिळवून हे काम सुरु झाल्याने शहराला मोठा दिलासा मिळेल.
संजय सावकारे, आमदार, भुसावळ

आऊटलेट ड्रेनेज : जलशुद्धीकरण केंद्रात पाण्यावर प्रक्रियेनंतर निघणारा गाळ आऊटलेट ड्रेनेज मधून तापी नदीत सोडला जात होता. त्यासाठी तापी नगरातून जाणारी भूमिगत यंत्रणा चोकअप झाली आहे. आता १२ इंची ५५० मीटर लांबीची नवीन पीव्हीसी पाइपलाइन टाकली जाईल.

पंपिंग हाऊस : सध्या ३०० एचपीचा पंप आहे. यातून पुरेसा दाब मिळत नाही. वाढीव १२० एचपीचा पंप बसवला जाईल. यामुळे पाण्याची पुरेशी आवक होईल. रॉ वॉटर ते प्युअर वॉटर दरम्यान काही ठिकाणी जीर्ण झालेली पाइपलाइन बदलली जाईल. यामुळे उचललेल्या पाण्याचा १०० टक्के वापर होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...