आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुक्ताईनगर:खडसेंच्या विजयानंतर फटाक्यांची आतषबाजी, पेढे वाटले ; जेसीबीवर चढून विजयाची घोषणाबाजी

जल्लोष7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अटीतटीची होईल असे वाटणाऱ्या विधान परिषद निवडणुकीत खडसेंनी दणदणीत विजय मिळवला. रात्री निकाल जाहीर होताच भुसावळ विभागात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि खडसे समर्थकांनी एकच जल्लोष केला. भुसावळ, यावल, सावदा, मुक्ताईनगर आणि बोदवड शहरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी फटाके फोडले. काहींनी एकमेकांना पेढे भरवले. दरम्यान, मुक्ताईनगर शहरात राष्ट्रवादी व सेनेचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याने काहीवेळ तणाव निर्माण झाला. मात्र, पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने काहीवेळातच परिस्थिती पूर्वपदावर आली.

माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या विजयाची घोषणा होताच भुसावळ शहरातील रजा टॉवर चौकात रात्री ९.३० वाजता कार्यकर्ते एकत्र आले. त्यात शेख पापा शेख कालू, शेख जाकीर पेंटर, शेख इम्रान शेख पापा, शेख वसीम शेख शफी, जोहेब सय्यद, अस्लम शाह मासूम शाह, शेख इम्रान यांचा समावेस होता. या सर्वांनी फटाक्यांची आतषबाजी केली. रस्त्याने ये-जा कणाऱ्यांना पेढ्यांचे वाटप देखील केले.

विधान परिषदेत राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचा विजय होताच कार्यकर्त्यांनी यावल शहरात बाजार समितीसमोर फटाक्यांची आतषबाजी व जल्लोष केला. माजी नगराध्यक्ष अतुल पाटील, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष प्रा. मुकेश येवले, राकेश कोलते, अॅड.देवकांत पाटील, किशोर माळी, राहुल चौधरी, दिनेश महाजन, अक्षय बोरोले, पराग सराफ, अरुण लोखंडे, एम.बी.तडवी, पवन पाटील, प्रकाश पारधे उपस्थित होते.

शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौकात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पेढे वाटून ढोल-ताशांच्या गजरात फटाक्यांची आतषबाजी केली. कमलेश भारंबे, गौरव वानखेडे, अतुल सरोदे, राजेश पाटील, उमेश भारंबे, साईराज वानखेडे, सौरभ नेमाडे, विजय तायडे उपस्थित होते. माजी नगरसेविका शबाना मुराद तडवी यांचे निवासस्थानी माजी नगरसेवक शेरखा तडवी, मुराद तडवी, नवाज तडवी यांनी जल्लोष केला.

राष्ट्रवादीचत्या कार्यकर्त्यांनी संपूर्ण शहरात फटाक्यांची आतषबाजी केली. ढोल-ताशांच्या गजरात विजयी मिरवणूक काढली. जेसीबीवर चढून कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. शहरातील राष्ट्रवादी कार्यालयाजवळ मोठी गर्दी झाली होती. दरम्यान, यावेळी प्रवर्तन चौकात शिवसेना व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमनेसामने आल्याने तणाव निर्माण झाला. मात्र, पोलिसांच्या दक्षतेमुळे मिरवणूक थांबून कार्यकर्त्यांना पांगवण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...