आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआठ दिवसांपूर्वी पहाटे तालुक्यातील मोरगाव खुर्द येथे जुगार अड्ड्यावर जळगाव स्थानिक गुन्हा शाखेने छापा टाकून १७ जणांवर कारवाई करून सुमारे ५५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. अलीकडच्या काळात जिल्ह्यात जुगारावरील हा सर्वात मोठा छापा समजला जाताे. शहरापासून सात कि.मी. अंतरावर एवढ्या मोठ्या प्रमाणावर जुगाराचा अड्डा सुरू असल्याची माहिती जळगाव एलसीबीला मिळते तर मग स्थानिक पोलिसांचे याकडे दुर्लक्ष होते का? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. असे असले तरी या छाप्यामुळे एका दगडात दोन नव्हे तर तीन पक्षी मारण्याची खेळी यशस्वी झाली.
तालुक्यात कायदा व सुव्यवस्था टिकवण्यासाठी रावेर, सावदा व निंभोरा ही तीन पोलिस ठाणे कार्यरत आहेत. दाेन राज्यांच्या सीमेवर तालुका असल्याने सराईत गुन्हेगारांना मार्ग मोकळा आहे. त्यामुळे या तिघांच्या कार्यक्षेत्रात अवैध धंदे सुरू असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी असूनही पोलिसांनी दुर्लक्ष केले. अवैध प्रवासी वाहतूक, वनसंपदा, गुटखा,
मोरगाव छाप्याला राजकीय कंगोरे असल्याची चर्चा माजी मंत्री व आमदार एकनाथ खडसे यांनी मुक्ताईनगर तालुक्यासह जिल्ह्यात अवैध धंदे सुरू असल्याचा प्रश्न विधिमंडळ अधिवेशनात उपस्थित केला. यानंतर काही दिवसांनी त्यांचा समर्थक असलेल्या एका व्यावसायिकावर कारवाई झाली. एलसीबी पथकाने प्रथम मुक्ताईनगर तालुक्यात फासा टाकला. मात्र हाताशी काही लागत नसल्याने माहिती घेत त्यांनी मोरगावला छापा टाकला. त्यात पोलिसांना यश मिळाले.
या छाप्यामुळे एलसीबीने एका दगडात दोन नव्हे तर तीन पक्षी गारद केले. मातब्बर नेत्याच्या मुक्ताईनगरातील समर्थकाविरुद्ध कारवाई केली. पूर्वी खडसे समर्थक व सध्याच्या भाजप पदाधिकाऱ्याचे पंख कारवाईतून छाटले. तर स्थानिक पोलिसांना बाजूला ठेवून केलेली कारवाई त्यांच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करून गेली. दरम्यान, असे असले तरी पोलिसांनी रावेर तालुक्यातील अवैध धंद्यांविरूद्ध सुरू केलेल्या कारवाईत सातत्य राखावे. सर्वसामान्यांना त्यामुळे होणाऱ्या जाचातून मुक्त करावे, असे सूरही या कारवाईनंतर उमटत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.