आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील सर्वाधिक खड्डेमय असलेल्या जामनेर रोडच्या डागडुजीचे काम पालिकेने मंगळवारी हाती घेतले. या रस्त्यावर पाणीपुरवठा करणाऱ्या पाइपलाइनची दुरुस्ती करण्यासाठी खोदकाम करण्यात आले होते. या खोदकामानंतर रस्त्यावर खड्ड्यांचे जंजाळ वाढले होते. पालिकेने संपूर्ण रस्त्यावर पॅचवर्क केल्याने वाहनधारकांना दिलासा मिळाला.
शहरातील रस्त्यांच्या कामांना पालिकेकडून प्राधान्य दिले जात आहे. १२ कोटी रुपये निधीतून होणाऱ्या कामांमध्ये मात्र जामनेर रोडचा समावेश नाही. यामुळे गेल्या काही महिन्यांमध्ये विशेषत: पावसाळ्यानंतर या रस्त्याची स्थिती बिकट झाली होती. पालिकेने मंगळवारी जामनेर रोडवरील पांडुरंग टॉकीज ते थेेट नाहाटा चौफुलीपर्यंतच्या रस्त्यावर पॅचवर्क केल्याने दिलासा मिळाला.
पालिकेने मंगळवारी शहरातील जामनेर रोडवरील खड्डे बुजवून रस्ता चकाचक केला. रखडलेल्या इतरही कामांना पालिका देणार गती शहरातील रस्त्यांचे प्रश्न पालिकेच्या माध्यमातून मार्गी लागत आहेत. रस्ते विकास, सुशोभिकरणावर भर आहे. जामनेर रोडवरील सर्व खड्डे डांबरीकरण पॅचवर्क करुन बुजवले. इतरही रखडलेल्या कामांना गती मिळेल, असे मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांनी सांगितले.
रखडलेल्या इतरही कामांना पालिका देणार गती शहरातील रस्त्यांचे प्रश्न पालिकेच्या माध्यमातून मार्गी लागत आहेत. रस्ते विकास, सुशोभिकरणावर भर आहे. जामनेर रोडवरील सर्व खड्डे डांबरीकरण पॅचवर्क करुन बुजवले. इतरही रखडलेल्या कामांना गती मिळेल, असे मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.