आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा:सोने चोरीनंतर ग्राहकांची दिवसभर बँकेत विचारणा ; पाेलिस कर्मचारी उत्तर प्रदेशात रवाना

भुसावळ4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील मणिप्पूरम फायनान्समधून व्यवस्थापकाने १ कोटी रुपये किमतीचे २ किलो ६० ग्रॅम वजनाचे सोने लांबवले. यानंतर बुधवारी सकाळपासून बँकेच्या ग्राहकांनी गर्दी केली. चौकशीत संशयिताने तारण ठेवलेल्या साेन्यापैकी १६ कर्जदारांचे साेने लांबवल्याचे उघड झाले.

बँकेत तब्बल १ हजार ग्राहकांनी साेने तारण ठेऊन कर्ज घेतलेले आहे. त्यातील १६ जणांचेच दागिने व्यवस्थापक विशाल राय याने लांबवल्याचा गुन्हा आहे. त्याला पकडण्यासाठी बाजारपेठ पााेलिस ठाण्याचे अधिकारी व पाेलिस कर्मचारी हे उत्तर प्रदेशात रवाना झाले आहेत. बुधवारी सायंकाळी ते गाेरखपूर येथे पाेहोचले होते.

बातम्या आणखी आहेत...