आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थिनींनी उज्ज्वल यश मिळवले:कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींची वक्तृत्व; वादविवाद स्पर्धेत चमक

मुक्ताईनगर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत आयाेजित आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व व वादविवाद स्पर्धेत येथील कृषी महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी उज्ज्वल यश मिळवले. काेल्हापूर येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालयात १७ व १८ ऑगस्ट रोजी या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या हाेत्या. महात्मा फुले कृषी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील ३९ कृषी महाविद्यालयातील २८५ विद्यार्थ्यांनी स्पर्धक म्हणून सहभाग नाेंदवला. यामध्ये येथील कृषी महाविद्यालयातील चार विद्यार्थी व तीन विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता. त्यापैकी प्रथम वर्ष महाविद्यालयातील विद्यार्थिनी गौरी थोरात हिने मराठी विषयात वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक तर स्नेहा वैद्य हिने इंग्रजी विषयात द्वितीय क्रमांक पटकावला. तर वादविवाद स्पर्धेत साक्षी काळभोर हिने तृतीय क्रमांक पटकावला. विद्यार्थ्यांनीही या स्पर्धांमध्ये यश मिळवले.

कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. संघ व्यवस्थापक म्हणून डॉ.उमराव बोंदर व डॉ.रियाज शेख यांनी परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालयातील प्राचार्य व प्राध्यापक यांनी त्यांचे कौतुक केले. सर्व स्तरातून या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात येत असून त्यांचा हुरूप वाढला आहे.

बातम्या आणखी आहेत...