आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निषेध‎:फैजपुरात कृषी मंत्री‎ सत्तार यांचा केला निषेध‎

फैजपूर5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

‎ खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयी‎ आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने, राज्याचे‎ कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांचा‎ राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे यावल‎ तालुकातर्फे निषेध करण्यात आला.‎ यासंदर्भात फैजपूर पोलिस‎ स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक यांच्या‎ कार्यालयासमोर निषेध करण्यात‎ करत, मंत्र्यांनी राजीनामा द्यावा,‎ अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात‎ आली. संसदरत्न खा. सुप्रिया सुळे‎ यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य‎ केल्याने यांच्या राज्यभरात‎ राष्ट्रवादीच्या वतीने निषेध करण्यात‎ येत आहे.

फैजपूर येथेही मंत्री‎ अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची‎ मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे‎ करण्यात आली. याबाबत पोलिस‎ स्टेशनला निवेदन सादर करण्यात‎ आले आहे. निवेदनावर महीला‎ विधानसभा क्षेत्रप्रमुख ममता‎ आमोदकर, महिला तालुकाध्यक्षा‎ प्रतिभा निळ, तालुका उपाध्यक्षा‎ कविता वैदकर, अश्विनी कोळंबे,‎ तालुका सरचिटणीस पूजा आफ्रे,‎ फैजपूर शहराध्यक्ष अनवर खाटीक,‎ कार्याध्यक्ष ज्योती वैदकर, नीलेश‎ आमोदकर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.‎

बातम्या आणखी आहेत...