आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाळा सुरू:आज सर्व 202 शाळांची घंटा वाजणार; तयारी पूर्ण

भुसावळ16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तब्बल दोन वर्षांनंतर १५ जूनपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत. त्यात शहरासह तालुक्यातील २०२ शाळांची घंटा वाजेल. ६४ हजार ३५७ विद्यार्थी पहिल्या दिवशी शाळेत येतील. त्यांचे स्वागत करण्यासह पहिल्याच दिवशी गणवेश, शालेय पुस्तके देण्यात येतील. बुधवारी शाळा उघडणार आहेत. तत्पूर्वी, सोमवार, मंगळवार दोन दिवसात सर्व शाळांमध्ये स्वच्छता करण्यात आली. यानंतर शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश, पुस्तके देण्याचे नियोजन आहे. त्या दृष्टीने सर्वच शाळांनी नियोजन केले आहे. गटशिक्षणाधिकारी किशोर वायकोळे यांनी दोन दिवसांपूर्वीच सर्व केंद्र प्रमुखांची बैठक घेऊन शालेय तयारीचा आढावा घेतला होता.

आता बुधवारी शहरासह तालुक्यातील २०२ शाळा सुरू हाेतील. त्यात जिल्हा परिषद, पालिका प्रशासन, खासगी प्राथमिक, खासगी माध्यमिक, केंद्रीय शाळांचा समावेश आहे. दरम्यान, सोमवारी मंगळवारी विद्यार्थ्यांचे गणवेश, बूट घेण्यासाठी पालकांची दुकानांमध्ये गर्दी झाली होती.

बातम्या आणखी आहेत...