आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादिवाळीच्या तब्बल २३ दिवसांच्या सुटीनंतर १४ नाेव्हेंबरला शाळेची घंटा वाजणार आहे. त्यासाठी शहरातील विविध शाळांची साफसफाई सुरू झाली आहे. तत्पूर्वी, इंग्रजी माध्यमाच्या काही शाळा आठवड्यापूर्वीच सुरू झाल्या आहेत.शहरातील शाळांना २१ ऑक्टोबरपासून दिवाळीची सुटी लागली हाेती. ही सुटी संपल्याने साेमवारी (दि. १४) शाळेची घंटा वाजेल. त्यासाठी गेल्या दाेन दिवसांपासून विविध शाळांमध्ये साफसफाई सुरू आहे. प्रत्येक वर्गखोली, पाण्याच्या टाक्या, स्वच्छतागृहांची सफाई होत आहे.
नादुरुस्त बेंच दुरूस्त केले जात आहेत. दरम्यान, गटशिक्षणाधिकारी किशाेर वायकाेळे यांनी शुक्रवारी शाळांच्या मुख्याध्यापकांची बैठक घेतली. त्यांनी १९ नोव्हेंबरला दिवशी जागतिक शाैचालय दिनानिमित्त विविध स्पर्धांचे आयाेजनाची सूचना केली. यानंतर जिल्ह्यांतर्गंत आॅनलाइइन बदल्याबाबतच्या शासन निर्णयाचे वाचन केले.
कार्यशाळा घेणार
निपुण चाचणी १ व २ मध्ये ज्या शाळेची गुणवत्ता कमी आढळली आहे, अशा ४० शाळांमधील शिक्षकांसाठी शासनातर्फे मार्गदर्शन कार्यशाळेचे आयाेजन केले जाणार आहे. यानंतर त्या-त्या शाळांमधील गुणवत्ता वाढण्यासाठी अधिकारी शाळाभेटी देतील.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.