आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुतळा:छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला परवानगी द्या; मंत्री एकनाथ शिंदेंना साकडे

भुसावळ10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी परवानगी द्यावी, या मागणीसाठी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांनी निवेदन दिले. भुसावळ नगरपालिका, दुकान संकुलाच्या पूर्वेला सर्वे क्रमांक ८३९ व ८४० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याबाबत परवानगी द्यावी, अशी मागणी प्रलंबित आहे. यासाठी वंचित बहुजन आघाडीने मुंबई येथे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. ही परवानगी न दिल्यास आंदोलनाचा इशारा दिला. निवेदनावर जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे, जिल्हा संघटक राजेंद्र बारी, बालाजी पठाडे, सचिन बाऱ्हे, गणेश जाधव, देवदत्त मकासरे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...