आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील प्रवर्तन चौकाकडून भुसावळकडे जाणाऱ्या रस्त्यावरील अंबिका ज्वेलर्स दुकान फोडून चोरट्यांनी चांदीचे ७० हजारांचे दागिने लांबवले. यामुळे खळबळ उडाली.
रविवारी (दि.८) मध्यरात्री चोरट्यांनी भुसावळ रोडलगतच्या अंबिका ज्वेलर्सचे शटर तोडून आत दुकानात प्रवेश केला. यानंतर दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची केबल तोडली. नंतर दुकानातील चांदीचे कडे, जोडवे मिळून ६६ हजार रुपये व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे ४ हजार रूपयांचा डीव्हीआर असा एकूण ७० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. सोमवारी सकाळी ८.३० वाजता कर्मचारी रामभाऊ सोनार हे नेहमीप्रमाणे दुकान उघडण्यासाठी आल्यावर शटर तोडल्याचे निदर्शनास आले. त्यांनी ही माहिती दुकान मालक अनिल शूरपाटणे यांना कळली. त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. यानंतर जळगाव येथील फॉरेन्सिक लॅबचे अधिकारी पोलिस निरीक्षक सचिन ढोंगरे, शकील चौधरी, मुरलीधर बारी, विनायक पाटील यांच्या पथकाने दुकानातील ५ फिंगर प्रिंट घेतले.
श्वान पथकाची मदत घेण्यात आली. घटनास्थळी एलसीबीचे पोलिस निरीक्षक किरण बखाले, उपनिरीक्षक दीपक पाटील, वसंत लिंगायत, राजेश मेढे, हिवरकर उपस्थित होते. मुक्ताईनगरचे डीवायएसपी डॉ.कुणाल सोनवणे, पोलिस निरीक्षक शंकर शेळके यांनी घटनास्थळी भेट घेत तपासाच्या सूचना दिल्या. चोरीप्रकरणी मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. तपास निरीक्षक शंकर शेळके हे करत आहे.
पथक रवाना, चोरट्यांना हुडकून काढणार
स्थानिक पोलिस, एलसीबीकडून तपास सुरू आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजचे सहाय्य घेऊन ज्या ज्या ठिकाणी संशय वाटत आहे, तेथे पथक रवाना झाले आहे. चोरट्यांना हुकडून काढू.
शंकर शेळके, पोलिस निरीक्षक, मुक्ताईनगर
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.