आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्या:भुसावळच्या प्रौढाने आमोदा शिवारात विहिरीत उडी घेऊन केली आत्महत्या

यावल3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ येथील रेशन दुकानावर सेल्समन असलेल्या ५६ वर्षीय प्रौढाने आमोदा शिवारातील विहिरीत आत्महत्या केली. ही घटना सोमवारी सायंकाळी उघडकीस आली. अशोक वामन भंगाळे (रा.लक्ष्मीनारायण नगर, भुसावळ मूळ रा.आमोदा ता.यावल) असे मृताचे नाव आहे. भंगाळे यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेली सुसाईड नोट पोलिसांच्या हाती लागली.

अशोक भंगाळे यांचे आमोदा गावी नेहमी येणेजाणे होते. सोमवारी ते दुचाकी घेऊन आमोदा येथे जाण्यासाठी घरून निघाले. मात्र, सायंकाळ होऊनही घरी परतले नाही. यामुळे कुटुंबीयांनी त्यांच्या मोबाइलवर कॉल केला. मात्र, हा कॉल एका वेगळ्याच व्यक्तीने उचलून कुणीतरी दुचाकीच्या डिकीत हा मोबाईल सोडल्याचे सांगितले. यानंतर आजूबाजूला शोधताना अशोक भंगाळे यांचा मृतदेह विहिरीत आढळला. संबंधितांनी ही माहिती भंगाळे यांच्या कुटुंबासह फैजपूर पोलिसांना दिली. फैजपूरचे एपीआय सिद्धेश्वर आखेगावकर हे घटनास्थळी आले. मृतदेह बाहेर काढून रात्री साडेनऊ वाजता यावल ग्रामीण रुग्णालयात आणला. येथे वैद्यकीय अधिकारी डॉ.बी.बी.बारेला यांनी शवविच्छेदन करत मृतदेह नातलगांना सोपवला. यानंतर रात्री आमोदा येथे अंतसंस्कार झाले. भरत भंगाळे यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद झाली.

असा झाला उलगडा...विरोदा-आमोदा रस्त्यावरील राहुल पाटील यांच्या विहिरीजवळ एक दुचाकी उभी होती. सायंकाळी फिरायला येणारे काही लोक विहिरीजवळ थांबले असताना दुचाकीच्या डिकीतून मोबाइलच्या रिंगचा वारंवार आवाज आला. एका जणाने कॉल उचलला. नंतर संशय म्हणून विहिरीत पाहिल्यावर मृतदेह दिसला.

बातम्या आणखी आहेत...