आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निषेध:भुसावळात पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री भुत्तो यांचा पुतळा जाळला

भुसावळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी भुसावळ शहरातील भाजपच्या कार्यकर्त्यानी पाकिस्तानी परराष्ट्र मंत्री बिलावल झरदारी यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला. पाकिस्तानच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. आमदार संजय सावकारे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित हाेते.शहरातील नाहाटा चौफुलीवर पुलाखाली आमदार सावकारे यांच्या उपस्थितीत भाजपच्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधान माेदी यांच्याविरुद्ध गरळ ओकणाऱ्या पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावत झरदारी यांच्या वक्तव्याचा निषेध केला.

पाकिस्तान मुर्दाबादची घाेषणाबाजी केली. बिलावत झरदारी यांच्या पुतळ्याला जाेडाे माराे आंदाेलन केले. नंतर पुतळा दहन करण्यात आले. दुपारी १.३० वाजता हे आंदोलन झाले. शहराध्यक्ष परिक्षित बऱ्हाटे, सरचिटणीस रमाशंकर दुबे, अमाेल महाजन, संदीप सुरवाडे, गिरीश महाजन, किशाेर पाटील, राजू आवटे, सुनील महाजन, अनिता आंबेकर, प्रा. दिनेश राठी, राजू नाटकर, उर्मिला पाटील, रामदास सावकारे, शैलाजा पाटील, मनीषा पाटील उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...