आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घटना:शौचास गेलेल्या वृद्धाचा रेल्वेचा धक्का लागून मृत्यू ; फेकरी गावाजवळील पहाटेची घटना

भुसावळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील फेकरी येथील रहिवासी रामकृष्ण शंकर सूर्यवंशी (वय ६५) हे शुक्रवारी पहाटे ५.३० वाजेच्या सुमारास शौचास गेले होते. यानंतर रेल्वे लाइनवर त्यांचा मृतदेह आढळला. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली. रामकृष्ण सूर्यवंशी हे नित्याप्रमाणे दररोज पहाटे ५.३० वाजेच्या सुमारास रेल्वे लाइन ओेलांडून झाडाझुडपांमध्ये शौचाला जात असत. ते नेहमीप्रमाणे शुक्रवारी पहाटे घराबाहेर पडले. मात्र, बराच वेळ होऊन देखील घरी परतले नाही. यामुळे कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेतला. त्यात रेल्वे लाइनजवळ त्यांचा मृतदेह पडलेला आढळला. त्यांचा एक पाय कापला गेल्याचे देखील समोर आले. त्यामुळे या भागातून जाणाऱ्या रेल्वे गाडीचा धक्का लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. पोलिस निरीक्षक विलास शेंडे यांनी घटनास्थळी पाहणी केली. हवालदार शामकुमार मोरे तपास करत आहे. दरम्यान, हा प्रकार उघडकीस आल्यावर घटनास्थळी अनेक ग्रामस्थांनी धाव घेतली.

बातम्या आणखी आहेत...