आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Jalgaon
  • Bhusawal
  • Anastha Is Responsible For Transportation Of Agricultural Commodities Including Bananas; Daina Of Khiroda Savkheda Road, Farmers, Students Are In Dire Straits| Marathi News

रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था:अनास्था केळीसह शेतीमाल वाहतुकीचा हाेताेय खाेळंबा; खिरोदा-सावखेडा रस्त्याची दैना,  शेतकरी, विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल

सावखेडा6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

खिरोदा ते सावखेडा रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम तत्काळ सुरू करावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून हाेत आहे.

परिसरातील केळीसह प्रवासी व इतर माल वाहतुकीसाठी हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा आहे. सावखेड्यातील शेकडो विद्यार्थी याच रस्त्याने खिराेद्यासाठी ये-जा करतात. त्यांना या खड्ड्यांमुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे. खराब रस्त्यामुळे वाहनधारकांना मणक्यांचे आजार जडले आहेत. चालकांना वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागते. अनेक वेळा अपघाताच्या घटनाही घडल्या आहेत. सध्या पावसाळा सुरू असल्याने रस्त्याची अवस्था अधिक बिकट झाली आहे. रस्त्यावर जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. रस्त्याच्या कामाबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे नागरिकांनी वारंवार तक्रारी केल्या. त्यावर रस्ता मंजूर झाला असून लवकरच काम सुरू होईल, असे उत्तर विभागाच्या सावदा कार्यालयातून मिळते. परंतु रस्त्याचे काम का सुरू होत नाही? या रस्त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष तर होत नाही ना? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. या रस्त्यावर सावखेडा गावाजवळ दोन ठिकाणी मोठे खड्डे पडले असून त्यात पाणी साचल्याने विद्यार्थी, वाहनधारकांना वाहने, सायकली कशा न्याव्या हेच समजत नाही.अपघात नित्याची बाब झाली आहे. बांधकाम विभागाने हे माेठे खड्डे बुजवावेत, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा दिला.

बातम्या आणखी आहेत...