आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशाचा अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी रेल्वे विभागात ७५ हजार पदांची भरती करण्याची घोषणा केली. मात्र, देशात रेल्वेमध्ये तीन लाखांपेक्षा जास्त पदे रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये भुसावळ विभागात तीन हजार कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. अर्थमंत्र्यांच्या घोषणेनंतर यंदाच्या वर्षात भरती प्रक्रिया मार्गी लागेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
भारतीय रेल्वेत तीन लाखांपेक्षा जास्त जागा रिक्त आहेत. यात २ हजार अधिकाऱ्यांच्या तर ३ लाख ८०६ जागा या कर्मचाऱ्यांच्या आहेत. तर मेट्राे रेल्वेत ९०० जागा रिक्त आहेत. मध्य रेल्वेच्या पाचही विभागातील भुसावळ, नागपूर, मुंबई, पुणे व साेलापूर या पाच विभागात कर्मचाऱ्यांच्या तब्बल २७ हजार जागा रिक्त आहेत. यात भुसावळ विभागातील रिक्त जागांची संख्या ही तीन हजार आहे. बजेटमध्ये झालेल्या घोषणेनुसार भुसावळ विभागातील ३ हजार कर्मचाऱ्यांचीही भरती हाेणार आहे. त्यामुळे अन्य कर्मचाऱ्यांवर पडणारा कामाचा ताण हलका होईल, अशी अपेक्षा कर्मचाऱ्यांमधून व्यक्त होत आहे. मागील दोन वर्षांत मुंबईसह अन्य विभागात मोठ्या संख्येने कर्मचारी निवृत्त झाले. मात्र, त्यांच्या जागेवर कर्मचारी भरती झालेली नाही. या पदांची भरती व्हावी यासाठी रेल्वेच्या विविध संघटनांकडून पाठपुरावा सुरू होता. त्यानंतरही भरतीची प्रक्रिया रेंगाळलेली होती. अर्थमंत्र्यांच्या घोषणेनंतर आयटीआय व अॅप्रेंटिस झालेल्या उमेदवारांमधून समाधान व्यक्त होत आहे.
रिक्त पदांचा तपशील (झोनलनिहाय)
झोनल पदे
मध्य रेल्वे २७,१७७
ईस्ट काॅस्ट रेल्वे ८४४७
ईस्ट सेट्रल रेल्वे १५,२६८
ईस्टर्न रेल्वे २८,२०४
मेट्राे रेल्वे ८५६
नाॅर्थ सेंट्रल रेल्वे १९,३६६
नाॅर्थ ईस्टर्न रेल्वे १४,२३१
नाॅर्थ ईस्ट फ्रंटियर १५,६७७
नाॅर्दन रेल्वे ३७,४३६
नाॅर्थ वेस्टन रेल्वे १५,०४९
साऊथ सेंट्रल रेल्वे १६,७१४
साऊथ ईस्ट सेंट्रल ९४२२
साऊथ इस्टर्न १६,८४७
साऊदर्न रेल्वे १९,५००
साऊथ वेस्टर्न ६५२५
वेस्ट सेंट्रल ११,०७३
वेस्टर्न रेल्वे २६,२२७
अन्य युनिटस १२,७६०
भुसावळ विभागात तीन हजार पदे रिक्त
मध्य रेल्वेतील भुसावळ विभागाचे कार्यक्षेत्र नाशिकराेड ते बडनेरा व भुसावळ ते खंडवा इतके माेठे आहेे. या विभागात सुमारे ३ हजार कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे एका कर्मचाऱ्याला दोन कर्मचाऱ्यांची कामे सांभाळावी लागत आहे.
पिंकबुकात कळेल माहिती
^रेल्वे बाेर्डाकडून पिंकबुक आल्यावर दाेन दिवसांनी सविस्तर विभागातील कामांसाठी किती निधी मिळाला. काेणते नवीन प्रकल्प मंजूर करण्यात आले. याची माहिती दिली जाणार आहे.
एस.एस. केडिया, डीआरएम, भुसावळ
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.