आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागुरुशिवाय भव्य जीवाला संसारातून पार करणारा दुसरा कोणीही नाही. गुरूंशिवाय दुसरा कोणीही मोक्ष मार्गाचा प्रणेता होऊ शकत नाही. आई-वडिलांमुळे जन्माचा शुभारंभ, तर गुरूंमुळे जीवनाचा शुभारंभ होतो. शिष्याचे जीवन तेव्हाच सफल होते जेव्हा त्याला दिगंबर गुरु भेटतात. गुरूचा अर्थ आहे भारी पणा जो अंधाराकडून प्रकाशाकडे, दुःखा कडून सुखाकडे घेऊन जातो. जीवन कसे जगावे? हे आपल्याला शिकवतात, असे मुनी श्री विशेष सागर महाराजांची सांगितले. महाराजश्री हे फैजपूर येथे मुक्कामी आहेत. यादरम्यान भक्तांशी संवाद साधताना त्यांनी गुरू-शिष्य नात्यावर प्रकाशझोत टाकला. गुरूंची महती वर्णन करताना ते म्हणाले की, गुरु हेच शिष्यांचे नेत्र असतात. तेच आमच्या सर्व समस्यांचे समाधान करतात. गुरू प्राप्त झाल्याने सर्व प्रश्नांचे उत्तर मिळतात. गुरुंच्या उपकारांची कोणीही परतफेड करू शकत नाही. जसे परिसाचा स्पर्श झाल्यावर लोखंडाचे सोने होते, तसेच गुरु रूपी परीसाने संसारी प्राणीदेखील सुवर्ण बनून जातात. गुरु हेच तरण तारण, रक्षक व खरे पारसमणी आहेत. ज्याप्रमाणे स्वाती नक्षत्रात पाण्याचा एक थेंब शिंपल्यात पडल्याने समुद्रात त्याचे मोत्यात रूपांतर होते. त्याचप्रमाणे गुरूच्या संगतीमुळे जीवनाचा उद्धार होतो. जोपर्यंत गुरूंच्या चरणात आत्मसमर्पण होणार नाही तोपर्यंत संसाररूपी समुद्रातून भवसागर पार होणार नाही, असे मुनी श्री विशेष सागर महाराजांनी प्रवचनात सांगितले. यावेळी फैजपूर जैन मंदिर विश्वस्त, भाविकांची उपस्थिती होती. दरम्यान, शहरात पंचकल्याण महोत्सवाची तयारी सुरु आहे. यावेळी हत्ती, घोडे पालखीतून ३० जून व ४ जुलैला भव्य मिरवणूक निघणार आहे. धार्मिक कार्यक्रम यावल रोडवरील सुमंगल लॉनवर होणार आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.