आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामीण भागात शिक्षणाची मोठ्या प्रमाणात हेळसांड:जिल्हा परिषद शाळांत पदवीधरांना नियुक्ती द्या; सीइओ डाॅ.आशियांना आमदार पाटील यांचे पत्र

मुक्ताईनगर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव जिल्ह्यात प्राथमिक शिक्षकांच्या कमतरतेमुळे ग्रामीण भागात शिक्षणाची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत आहे. जिल्हा परिषदेच्या ज्या शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता आहे त्या शाळांच्या ग्रामपंचायतींना तात्पुरत्या स्वरूपात स्थानिक शैक्षणिक पदवीधारक उमेदवारांच्या नियुक्तीचे अधिकार द्यावे, तसेच शिक्षकांच्या मानधनाची तरतूद केंद्र शासनाच्या ग्रा.पं. स्तरावरील १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतील २५ टक्के शिक्षण, उपजीविका तरतुदीतून करावी, अशा आशयाचे पत्र मुक्ताईनगर मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ.पंकज आशिया यांना दिले.

आमदार पाटील यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, जळगाव जिल्ह्यात प्राथमिक शिक्षकांच्या कमतरतेमुळे ग्रामीण भागात विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत आहे. त्या शाळांवर पदवीधरांची नियुक्ती केल्यास त्यांना रोजगार मिळेल आणि ग्रामीण भागातील शिक्षणाचा प्रश्नही सुटणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाने १५ व्या वित्त आयोगाच्या कृती आराखड्यातील तरतुदींबाबत गांभीर्याने विचार करावा व ग्रामीण भागातील शिक्षणाचा प्रश्न तत्काळ सोडवण्यात यावा, अशी मागणी पत्रात नमूद केली आहे.दरम्यान आता जिल्हा परिषद प्रशासन या संदर्भात काय निर्णय घेते याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. विशेषत: ज्यांचे नुकसान हाेत आहे असे विद्यार्थी व त्यांचे पालक यांची अपेक्षा वाढली आहे.

बातम्या आणखी आहेत...